Astrology Diwali 2024 : सध्या देशभरात दिवाळी साजरी केली जात आहे. देशात लक्ष्मीपुजन काही ठिकाणी ३१ ऑक्टोबर तर काही ठिकाणी १ नोव्हेंबरला साजरे केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार ३१ ऑक्टोबरच्या दिवशी शनि आणि गुरूचा अद्भुत संयोग निर्माण होत आहे. या दिवशी शनि आणि गुरू दोन्ही ग्रह वक्री चाल चालत आहे. शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभमध्ये वक्री करत आहे आणि गुरू वृषभ राशीमध्ये वक्री करत आहे.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर शनि आणि गुरूची एकसारखी चाल तीन राशीच्या लोकांसाठी फायद्याची ठरू शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत?
वृषभ राशी
गुरू आणि शनिची उलट चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी फायद्याची ठरेन. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतील. या लोकांना भरपूर धनलाभ मिळेन. नवी नोकरीच्या शोधात असलेल्यांना शुभ वार्ता मिळेल. त्यांना नोकरीची संधी मिळू शकते. यांना मोठे पद आणि पगार मिळू शकते. कामाच्या ठिकाणी या लोकांच्या अडचणी दूर होतील. यांना व्यवसायात भरपूर लाभ होईल. अनेक ठिकाणी नफा मिळेल. अनेक स्त्रोतांद्वारे यांना पैसा मिळू शकतो.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांना या काळात धनधान्याची प्राप्ती होईल. यांच्या करिअरमध्ये भरपूर प्रगती होईल. जुन्या गुंतवणुकेतून लाभ मिळेल. यात्रांचा योग जुळून येईल. सासरच्या लोकांच्या सहकार्याने हे लोक महत्वाचे काम पूर्ण करू शकतील. आयुष्यात सर्व मनाप्रमाणे होईल. आर्थिक वृद्धी होईल.
कुंभ
या काळात कुंभ राशीच्या लोकांना भरपूर लाभ दिसून येईल. धन धान्यामध्ये वाढ होऊ शकते. हे लोक कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकतील. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. समाजात या राशींच्या लोकांचा मान सन्मान वाढेल. खर्च आणि कर्जामुळे वाढलेल्या समस्या समाप्त होईल. आर्थिक वृद्धी होईल. माता लक्ष्मीच्या कृपेने घरात धनसंपत्ती वाढेन.
स्रोत : लोकसत्ता