अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दिवाळी सेल उद्या संपणार आहे. याआधी ग्राहकांना आयफोन १३, सॅमसंग गॅलेक्सी एस २३ 5G एआय आणि वनप्लस १२ स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
अॅमेझॉनवर सुरू असलेला ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दिवाळी सेल उद्या म्हणजेच २९ ऑक्टोबर 2024 ला संपणार आहे. दरम्यान, वनप्लस, सॅमसंग किंवा अॅपलचे महागडे फोन मोठ्या सवलतीसह खरेदी करण्याची शेवटची संधी आहे. या तिन्ही फोनच्या खरेदीवर ग्राहक सात हजारांपर्यंतचे डिस्काउंट मिळत आहे. विशेष म्हणजे, सेलमध्ये तुम्ही हे फोन कॅशबॅक आणि बंपर एक्स्चेंज डील्समध्येही ऑर्डर करू शकतात. परंतु, एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी अतिरिक्त सूट आपला जुना फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.
वनप्लस १२ च्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत ६१ हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये ग्राहक हा फोन सात हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. फोनवर ३ हजार १०० रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिला जात आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत ५३ हजार २०० रुपयांपर्यंत कमी केली जाऊ शकते. फोनमध्ये 2K रिझोल्यूशनसह १२० हर्ट्झ प्रोएक्सडीआर डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळत आहे. फोनची बॅटरी ५ हजार ४०० एमएएचची आहे, जी १०० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा 5G एआय (१२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज) फोनची किंमत ७४ हजार ९९९ रुपये आहे. फोनवर १ हजार रुपयांचा कूपन डिस्काउंट दिला जात आहे. सेलमध्ये फोनवर ३ हजार ७५० रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिला जात आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत ६० हजार ६०० रुपयांपर्यंत कमी करू शकता. या फोनमध्ये तुम्हाला २०० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. हा फोन स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेटवर काम करतो.
आयफोन १३:
अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलच्या दिवाळी स्पेशल डीलमध्ये आयफोन १३ (१२८ जीबी स्टोरेज) रेड व्हेरियंट ४२ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये तुम्ही याची किंमत १ हजार रुपयांनी कमी करू शकता. फोनवर २ हजार १५० रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिला जात आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत ४० हजार ४५० रुपयांपर्यंत कमी करू शकता. आयफोन १३ मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले मिळतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या रियरमध्ये १२ मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा ट्रू डेप्थ कॅमेरा दिला आहे. हा फोन ए१५ बायोनिक चिपसेटवर काम करतो.
Infinix Zero Flip Price and Specifications: लोकप्रिय टेक ब्रँड इनफिनिक्सच्या वतीने त्याचा पहिला फ्लिप फोन इनफिनिक्स झिरो फ्लिप नुकताच लाँच करण्यात आला असून तो कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. या डिव्हाइसची खास वैशिष्ट्ये म्हणजे फोल्डेबल डिस्प्लेव्यतिरिक्त एआय सपोर्टसह ५० एमपी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ७० वॉट फास्ट चार्जिंग आणि मीडियाटेक प्रोसेसरसह कॉम्पॅक्ट डिझाइन देण्यात आले आहे.
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर ग्राहकांना या लेटेस्ट फ्लिप फोनवर खास डिस्काउंटचा फायदा मिळत आहे. या डिव्हाइसवर बँक डिस्काउंटचा फायदा दिला जात आहे. या फोनच्या खरेदीवर ग्राहक एक्स्चेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकतात. फोनमध्ये ५१२ जीबी स्टोरेज आणि ५० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. रॉक ब्लॅक आणि ब्लॉसम ग्लो या दोन कलर ऑप्शनमध्ये इनफिनिक्स झिरो फ्लिप 5G खरेदी करण्याचा पर्याय ग्राहकांना मिळत आहे.
इनफिनिक्स झिरो फ्लिप फोन ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला असून त्याची किंमत ४९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना फ्लिपकार्टवर ५००० रुपयांची सूट मिळत आहे. एक्स्चेंज ऑफरतंर्गत ग्राहकांना २८ हजार २०० रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे. ज्याची किंमत जुन्या फोनच्या मॉडेल आणि कंडीशनवर अवलंबून असते.
इनफिनिक्स डिव्हाइसमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह ६.९ इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले आहे. प्रायमरी डिस्प्लेला यूटीजी प्रोटेक्शन आणि कव्हर डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास व्हिक्टस २ प्रोटेक्शन मिळते. याशिवाय मीडियाटेक डायमेंसिटी ८०२० प्रोसेसरसह चांगला परफॉर्मन्स मिळतो. यात ५० एमपी मेन आणि ५० एमपी सेकंडरी सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे आणि ५० एमपी सेल्फी कॅमेरा मिळतो. जेबीएल स्पीकर्ससह येणाऱ्या या फोनमध्ये ४ हजार ७२० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यात ७० वॅट फास्ट चार्जिंग मिळत आहे.
इन्फिनिक्सने आपला नवा 4G फोन नुकताच जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा फोन इनफिनिक्स हॉट ५० प्रो आहे. इन्फिनिक्सच्या नव्या फोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी१०० एसओसी प्रोसेसर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज देण्यात आला आहे. इनफिनिक्स हॉट ५० प्रो मध्ये ६.७८ इंचाचा डिस्प्ले असून ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. नव्या स्मार्टफोनमध्ये वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्ससाठी आयपी ५४ रेटिंग असून ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
स्रोत: हिंदुस्थान टाइम्स