JioBharat Feature Phones: जिओने जिओभारत दिवाळी धमाका ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत ९९९ रुपयांचा जिओभारत 4G फोन अवघ्या ६९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
जिओच्या १२३ रुपयांच्या मासिक रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉल, दरमहा १४ जीबी डेटा, ४५५ हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल, मूव्ही प्रीमियर आणि लेटेस्ट चित्रपट, व्हिडिओ शो, लाइव्ह स्पोर्ट्स प्रोग्राम, जिओसिनेमावरील हायलाइट्स, क्यूआर कोड स्कॅनसह डिजिटल पेमेंट सारखे फायदे मिळतात. जिओभारत 4G फोनमध्ये जिओपे आणि जिओचॅट सारख्या प्रीलोडेड अॅप्सदेखील आहेत.
जिओचा १२३ रुपयांचा मासिक रिचार्ज प्लान इतर ऑपरेटर्सच्या (१९९ रुपये प्रति महिना) तुलनेत ४०टक्के स्वस्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. इतर कंपन्या फीचर फोनच्या मासिक रिचार्जसाठी किमान १९९ रुपये आकारतात. जिओपेक्षा ७६ रुपये महाग आहे. म्हणजेच जर ग्राहकाने प्रत्येक रिचार्जवर दरमहा ७६ रुपयांची बचत केली तर, संपूर्ण फोनची किंमत ९ महिन्यांत वसूल होईल.
- जिओचा १७५ रुपयांचा ओटीटी प्लॅन: जिओचा सर्वात स्वस्त प्लान केवळ डेटा-ओनली प्लान आहे आणि यात २८ दिवसांच्या वैधतेसह 10 जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. मात्र, या प्लानसोबत रिचार्ज केल्यास कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट दिले जात नाही. ओटीटी बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर सोनीलिव्ह आणि झी5 सह 10 ओटीटी सेवांचा कंटेंट पाहण्याचा पर्याय दिला जात आहे.
- जिओचा ४४८ रुपयांचा ओटीटी प्लान: जिओटीव्ही प्रीमियम प्लानचा भाग आहे आणि यात २८ दिवसांच्या वैधतेसह दररोज २ जीबी डेटा मिळतो. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते आणि ओटीटी बेनिफिट्सच्या यादीमध्ये सोनी लिव्ह आणि झी5 सारख्या डझनभर सेवांचा समावेश आहे. यात दररोज १०० एसएमएसव्यतिरिक्त जिओ अॅप्सचा अॅक्सेस मिळतो.
स्रोत: हिंदुस्थान टाइम्स