Multibagger Penny Stock : मागच्या पाच वर्षांत ६५० टक्के परतावा देणाऱ्या पॅरामाऊंट कम्युनिकेशन्स या चिमुकल्या कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे.
Multibagger Stock : मल्टीबॅगर पेनी स्टॉक पॅरामाउंट कम्युनिकेशन्सने आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. सोमवारी व्यवहारादरम्यान कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ७०.९० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी भाव ११६.७० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी भाव ५४.३६ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप २०९२.७७ कोटी रुपये आहे.
पॅरामाऊंट कम्युनिकेशन्सच्या शेअरच्या किंमतीत गेल्या चार वर्षांत ९१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये ७ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर सध्या ७०.९० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांतच या शेअरमध्ये ५०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षी २० टक्क्यांनी वाढ नोंदविल्यानंतर या वर्षी २०२४ मध्ये या शेअरमध्ये आतापर्यंत २१ टक्क्यांची घसरण झाली आहे. पॅरामाउंट कम्युनिकेशन्सने डिसेंबर २०२३ मध्ये विक्रमी उच्चांक गाठला.
पॅरामाउंट कम्युनिकेशन्सचे तिमाही निकाल
पॅरामाउंट कम्युनिकेशन्सचा निव्वळ नफा सप्टेंबर तिमाहीत (आर्थिक वर्ष २०२५) ४.३१ टक्क्यांनी वाढून २०.३३ कोटी रुपये झाला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीची विक्री ४०.९८ टक्क्यांनी वाढून ३५५.८९ कोटी रुपये झाली आहे, जी गेल्या वर्षी याच तिमाहीत २५२.४४ कोटी रुपये होती.
काय करते कंपनी?
श्याम सुंदर अग्रवाल यांनी १९७८ मध्ये स्थापन केलेली पॅरामाऊंट कम्युनिकेशन्स ही वायर आणि केबल वायर उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी वीज, दूरसंचार, रेल्वे आणि इतर उद्योगांसाठी विविध प्रकारच्या केबल तयार करते. पॅरामाऊंट जागतिक स्तरावर ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, चिली, घाना, लिबिया, म्यानमार, नायजेरिया, टांझानिया, संयुक्त अरब अमिराती, ब्रिटन, अमेरिका आणि झांबिया सारख्या बाजारपेठांमध्ये आपली उत्पादनं निर्यात करते. ही कंपनी राजस्थानमधील खुशखेडा आणि हरियाणातील धारुहेरा इथं उत्पादन प्रकल्प चालवते.
स्रोत: हिंदुस्थान टाइम्स