Suzlon Energy Share Price : मागच्या महिनाभरात ११ टक्क्याहून अधिक घसरलेल्या सुझलॉनच्या शेअरनं आज अनपेक्षित उसळी घेतली.
Suzlon Energy Share Price : सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये सोमवारी वादळी वाढ पाहायला मिळाली. एका क्षणाला कंपनीचे शेअर्स ७ टक्क्यांहून अधिक तेजीसह व्यवहार करत होते. या तेजीमागचे कारण कंपनीशी संबंधित मोठी बातमी असल्याचे मानले जात आहे. आज म्हणजेच २८ ऑक्टोबरला कंपनीकडून तिमाही निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. ज्याची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत होते.
बीएसईवर सुझलॉन एनर्जीचा शेअर ६७.८९ रुपयांवर खुला झाला. दिवसभरात कंपनीचा शेअर ७.७५ टक्क्यांनी वधारून ७२.६६ रुपयांवर पोहोचला. तज्ज्ञांना सुझलॉन एनर्जीचे वार्षिक आधारावर मजबूत तिमाही निकाल अपेक्षित आहेत.
मागील वर्षी काय होती परिस्थिती?
गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ३०२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. वार्षिक आधारावर हा नफा २०० टक्के अधिक होता. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत सुझलॉन एनर्जीला १०१ कोटी रुपयांचा नफा झाला होता. एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीचा ऑपरेटिंग रेव्हेन्यू २,०१६ कोटी रुपये होता. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तो १३४८ कोटी रुपये होता.
शेअरची वाटचाल सकारात्मक
गेल्या वर्षभरात सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये ७० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर, ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्ष हा शेअर ठेवला आहे, त्यांना १२४ टक्के परतावा मिळाला आहे. मागच्या महिनाभरात मात्र हा शेअर काहीसा घसरला आहे. त्यात ११ टक्के घसरण झाली आहे. सुझलॉन एनर्जीचा ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ८६.०४ रुपये आहे तर, ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३०.११ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ९६७९२.७३ कोटी रुपये आहे.
स्रोत: हिंदुस्थान टाइम्स