अमरावती: सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. दिवाळीसाठी सर्वजण नवीन कपडे आणि इतर खरेदीसाठी जवळचं मार्केट गाठतात. अमरावतीतही स्वस्तात मस्त शॉपिंग करायची असेल तर अंबादेवी मार्केट हा एक उत्तम पर्याय आहे. या मार्केटमध्ये ज्वेलरी, कपडे, सजावटीचे साहित्य, देवपूजेचं साहित्य, चप्पल्स, रांगोळी आणि इतर अन्न पदार्थ सुद्धा अगदी वाजवी किमतीत मिळतात. याच मार्केटबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
सध्या मुलींमध्ये शॉर्ट कुर्ती आणि जिन्स जास्त चालतात. त्या कुर्ती तुम्हाला अंबादेवी मार्केटमध्ये 150 रुपयांपासून उपलब्ध आहेत. त्यामध्ये तुम्हाला हवे असलेले सुंदर रंग आणि डिझाईन सुद्धा मिळून जातात. 150 रुपयांपासून सुरवात होऊन तुम्हाला पाहिजे तशा कुर्ती वेगवेगळ्या रेंजमध्ये येथे मिळतात. त्याचबरोबर 300 रुपयांपासून जिन्स आणि 200 रुपयांपासून सुंदर क्रॉप टॉप सुद्धा येथे मिळतो.
घरी वापरण्यासाठी 100 रुपयांपासून प्लाझो पँट आणि टी-शर्ट सुद्धा येथे मिळतात. 100 रुपयांपासून हॅण्ड बॅग या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. दिवाळीतील सजावटीचं साहित्य 30 रुपयांपासून इथं मिळेल. तसेच रंगीबेरंगी दिवे, प्रसाद, कंदील या सर्व वस्तू माफक दरात आणि पाहिजे त्या क्वालिटीमध्ये याठिकाणी उपलब्ध आहेत.
20 रुपयांत किलो रांगोळी
दिवाळीला 5 दिवस लागणारी रांगोळी सुद्धा तुम्ही येथून खरेदी करू शकता. इतर ठिकाणी रांगोळी महाग मिळते. इथे 20 रुपये किलो पांढरी रांगोळी आणि इतर कलर 10 रुपये ग्लासने मिळतात. रांगोळीचे कलर सुद्धा एकदम आकर्षक आहेत.
कुठं आहे मार्केट?
अमरावतीत दिवाळीची सर्व शॉपिंग एकाच मार्केट मध्ये तुम्ही करू शकता. अंबादेवी मार्केट हे अमरावती डेपोपासून जवळ आहे. तेथून तुम्ही 20 रुपयांत ऑटोने अंबादेवी मार्केट मध्ये जावू शकता. राजकमल चौक, गांधी चौक या दोन्ही चौकातून हे मार्केट अगदी जवळ आहे.