दरम्यान, ३१ ऑक्टोबरच्या भागात नवा ‘टाइम गॉड’ विवियन डिसेनाने रजत दलाल आणि श्रुतिकाला जेलमध्ये जेलमध्ये पाठवलं आहे. पण, ‘बिग बॉस’ने जेलमध्ये जाणाऱ्या सदस्यांच्या अधिकारात बदल केला आहे. याआधी जेलमध्ये असणाऱ्या दोन सदस्यांना रेशन वाटपाचा अधिकार देण्यात आला होता. पण, आता वेगळा अधिकार देण्यात आला आहे. रजत आणि श्रुतिकाला ‘बिग बॉस’ने दररोज घरात जेवणासाठी कोणते पदार्थ बनणार, हे ठरवण्याचा अधिकार दिला आहे.

स्रोत: लोकसत्ता