दिवाळीच्या आसपास सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणारे बरेच लोक सोन्याचे दागिने, सोन्याचे बार किंवा सोन्याची नाणी खरेदी करतात. कधीकधी, ते रत्नांसह सोन्याच्या वा हिऱ्याच्या दागिन्यांना प्राधान्य देतात, शक्यतो या दिवाळीत सोन्याचे दागिने किंवा डायमंड ज्वेलरी घेतली तर ती फायदेशीर ठरेल की नाही असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात असतात याचे महत्वाचे कारण म्हणजे दिवाळीसारख्या पारंपारिक सोहळ्यांसाठी आणि लग्नाच्या उत्सवांसाठी, सोन्याला त्याच्या काळातीत आकर्षण आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे पसंती दिली जात आहे.
दिवाळीच्या आसपास सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अनेक लोक गुरुपुष्यामृत योगाची वाट पाहत असतात. बरेच लोक दागिने म्हणून १८, २०, २२ कॅरेट सोने आपल्या आर्थिक क्रयशक्तीनुसार खरेदी करण्यास प्राधान्य देतात. लग्नाच्या हंगामापूर्वी गुंतवणुकीच्या उद्देशाने अनेक लोक दिवाळीमध्ये सोन्याचे दागिने खरेदी करत असले तरी, रत्नांशिवाय सोन्याचे दागिने खरेदी करायचे की हिऱ्यांचे दागिने खरेदी करायचे असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. सोन्यासारख्या मौल्यवान धातू किंवा हिऱ्यांसारख्या काही रत्नांचा वापर करून अनेक प्रकारचे दागिने बनवता येतात ते खरे उपयोगित्व आहे. याव्यतिरिक्त किंमतवान हिऱ्याचे दागिने अंगावर घालून मिरवणे हे आजकाल स्त्रियांचे स्टेटस सिम्बॉल झाले आहे. याचे मुख्य कारण सर्वसाधारण स्रियांना सोन्याचे आणि हिऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आकर्षण असते व याच कारणाने बाजारात या व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर पसंती असल्याचे दिसून येते.
१. हिरे भारतीय मानक ब्युरोद्वारे हॉलमार्क केले जाऊ शकत नाहीत
या दिवाळीत हिऱ्यांच्या दागिन्यांपेक्षा सोन्याचे दागिने किंवा सोन्याची नाणी आणि बार खरेदी करणे चांगले व व्यवहार्य आहे. सोन्याच्या विपरीत, ज्याला भारतीय मानक ब्युरोद्वारे हॉलमार्क केले जाऊ शकते, तसे हिऱ्यांच्या बाबतीत नसल्याने हिऱ्याच्या गुणवत्ता स्पष्टतेबद्दल सामान्य खरेदीदारास नेहमीच प्रश्न पडत असतो. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) सारख्या विश्वासार्ह सरकारी एजन्सीकडून हिऱ्याच्या गुणवत्तेच्या स्पष्टतेबद्दल कोणतेही प्रमाणपत्र मिळत नाही यावर खरेदीदार व्यावसायिकाच्या फक्त विश्वासार्हतेवरच अवलंबून राहू शकतो जे कधी कधी दुकानदार परिचित नसल्यास धोक्याचे ठरू शकते.
२. बायबॅक पर्यायांद्वारे हिऱ्यांचे योग्य पुनर्विक्री मूल्य मिळणे कठीण
कोणताही हिऱ्याचा व्यापारी बायबॅक पर्यायांद्वारे हिऱ्यांचे योग्य पुनर्विक्री मूल्य मिळणे कठीण असल्याने सदर खड्यास सरकारने उपभोग्य मानले आहे तर सोन्यास मालमत्ता म्हणून वेगळा वर्ग प्रदान केला आहे.
३. हिऱ्याच्या किमतीत घसरण
जगभरात सध्या हिऱ्याच्या किमती घसरत आहेत आणि तळ कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही. ही घसरण तात्पुरतीदेखील असू शकते. गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून, सोन्याचे स्कोअर हिऱ्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या दहा वर्षांचा सोन्याच्या किमतीचा इतिहास पाहिला तर दरवर्षी सोन्याने उत्तम परतावा दिलेला आहे व एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोन्याच्या या खरेदीकडे पाहिले जाऊ शकते.
४. हिऱ्याच्या तारणावर कर्ज मिळणे कठीण
कोणतीही व्यक्ती राष्ट्रीयकृत, सहकारी वा खाजगी कंपन्यांकडून सोन्याच्या तारणावर सहजपणे ‘सोने कर्ज’ घेऊ शकते, परंतु बँका हिऱ्यांवर कर्ज देत नाहीत. त्यामुळे अडी अडचणीच्यावेळी सोने घरगुती आर्थिक अडचणी सोडवू शकते. सावकार मंडळीदेखील सोन्याच्या तारणावर रात्री अपरात्री देखील कर्ज देतात तसे ते हिऱ्यांच्या दागिन्यावर देत नाहीत.
५. कृत्रिम हिऱ्याची नैसर्गिक हिऱ्याशी स्पर्धा
आता प्रयोगशाळेतही हिरे तयार होतात. त्यामुळे त्यांची कोळशाच्या खाणीत सापडलेल्या हिऱ्यांशी स्पर्धा आहे. प्रयोगशाळेत तयार झालेले कृत्रिम हिरे हे नैसर्गिक हिऱ्यासारखेच असतात. त्यातील फरक समजत नाही. त्यामुळे हिऱ्याचे दागिने परिधान करणाऱ्यांनाच हे माहीत असते की हिरा नैसर्गिक आहे की प्रयोगशाळेत तयार केलेला आहे.
६. भिन्न किंमती
हिऱ्याच्या दागिन्यांच्या किंमती विविध दुकानदारांमध्ये भिन्न असू शकतात जरी गुणवत्ता सारखी असली तरी तसे सोन्याचे होत नाही. सोन्याचा दर सर्व ठिकाणी समान असतो. तथापि, मेकिंग चार्जेस मात्र भिन्न असू शकतात.
७. गुंतवणूक दृष्टिकोन
गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून सोन्याच्या बारमधील गुंतवणूक हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. दागिन्यांच्या बाबतीतही, सोन्याचे दागिने हिऱ्यांच्या दागिन्यांपेक्षा चांगला परतावा देतात. डायमंड ज्वेलरी खरेदी करताना, खरेदीदार अंदाजे ५०% खड्यात आणि ५०% सोन्याच्या आवेष्टनात गुंतवतात. ऐतिहासिक डेटाने गेल्या काही दशकांमध्ये सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ दर्शविली आहे, जे दाखवते की सोन्याने गुंतवणूक म्हणून आशादायक परताव्याचे परिणाम दाखवले आहेत. तथापि, डायमंड ज्वेलरी गुंतवणुकीच्या जोखमींचा एक वेगळा परंतु सुरक्षित संतुलन प्रदान करीत असले तरी परतावा जोखमीनुरूप नाही असे काही तज्ज्ञ म्हणतात. सोने आणि हिऱ्यांच्या किमतीतील संभाव्य चढउतार गुंतवणुकीला स्थिर करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतात व गुंतवणुकीच्या स्थिरतेबद्दल खात्री देतात. म्हणून, खरेदीदार हिरे आणि सोन्याचे मूल्य कसे ओळखतो यावर वैयक्तिक प्राधान्यांवर अवलंबून असते.
८. जागतिक अनिश्चितता आणि सुरू असलेले संघर्ष
जागतिक अनिश्चितता आणि चालू असलेल्या संघर्षांमुळे, सोन्याच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे दीर्घकालीन मूल्यासाठी एक व्यवहार्य पर्याय बनतो. म्हणून या दिवाळीत साधी, तरल आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी सोने हा एक मजबूत पर्याय आहे. तथापि, सध्याच्या हिऱ्याच्या किमती नेहमीपेक्षा कमी असल्याने हिरे पण एक आकर्षक संधी देखील देतात. हे हिरे एक व्यवहार्य आणि संभाव्य फायद्याची गुंतवणूक बनवू शकते, विशेषत: त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू पाहणाऱ्यांसाठी.
९.बदलती जीवनशैली
जसजशी दिवाळी जवळ येते तसतसे ग्राहकांना सोन्याचे किंवा हिऱ्याचे दागिने विकत घेण्याच्या निवडीचा सामना करावा लागतो, या दोन्हींचे अमूल्य आहेत. लग्नसराईचा हंगाम जवळ आल्याने लग्नाच्या दागिन्यांना जास्त मागणी आहे. सोन्याच्या किमतीतील सध्याची वाढ लक्षात घेता, बरेच ग्राहक हलके, रोजच्या वापरासाठी हिऱ्याच्या दागिन्यांची निवड करत आहेत, जे शोभा, पैशाची चमक आणि व्यावहारिकतापण देतात. तथापि, सोन्याच्या उच्च किंमतींचा सोन्याच्या खरेदीवर परिणाम होऊ शकतो, परंतु ग्राहकांच्या खर्चाचे एकूण मूल्य लक्षणीय राहते. पारंपरिक सोहळ्यांसाठी आणि लग्नाच्या उत्सवांसाठी, सोन्याला त्याच्या कालातीत आकर्षण आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे प्राधान्य दिले जाते. तथापि, दैनंदिन पोशाख आणि सामाजिक संमेलनांसाठी, हिरे आधुनिक, ट्रेंडी लूक देतात, जे त्यांना शैली आणि दीर्घकालीन मूल्य दोन्ही शोधत असलेल्यांसाठी एक आकर्षक पर्याय बनवतात.
हिरे त्यांच्यात उपजत असलेल्या चमकतेमुळे लोकांना भुरळ घालत असताना, अनेक युगांपासून लोकांसाठी गुंतवणूक पर्याय म्हणून सोने देखील अतुलनीय आहे. हिऱ्यांच्या तुलनेत सोन्यात गुंतवणूक केल्याने अनेक फायदे मिळतात. सोने हे अत्यंत तरल आहे, एक सुस्थापित जागतिक बाजारपेठ आहे ज्यामुळे खरेदी आणि विक्री करणे सोपे होते. त्याचे मूल्य ऐतिहासिकदृष्ट्या संपत्तीचे भांडार म्हणून ओळखले गेले आहे आणि ते विशेषत: कृत्रिम अस्थिर बाजारपेठांमध्ये. दीर्घकालीन स्थिरता देते, आर्थिक मंदीच्या काळात सोन्याला सुरक्षित आश्रयस्थान मानले जाते, तर हिऱ्यांवर ‘खरेदी कल’ आणि ‘गुणवत्ता स्पष्टता’ यासारख्या व्यक्तिनिष्ठ वैशिष्ट्यांचा प्रभाव असतो. याव्यतिरिक्त, सोने अधिक विश्वासार्ह आहे आणि कृत्रिमरित्या उत्पादित केले जाऊ शकत नाही, कालांतराने त्याची दुर्मिळता आणि सातत्यपूर्ण मूल्य सुनिश्चित करते. याउलट, प्रयोगशाळेत उत्पादित कृत्रिम हिऱ्यांच्या उदयामुळे किमतीत लक्षणीय घट झाली आहे आणि हिरे बाजारातील मागणी कमी झाली आहे, जे पुढील आव्हानात्मक आहे. तज्ज्ञांनी सांगितलेल्या माहिती आधारे असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की जर खरेदीदाराच्या मनात फक्त गुंतवणूक असेल तर फक्त सोन्यामध्ये जाणे हा एक चांगला पर्याय असू शकतो परंतु हिऱ्याला स्वतःचे आकर्षण आहे जे अनेकांना त्याच्या उपयोगिता मूल्यामुळे अलंकार म्हणून पसंत करू शकतात. हा वैयक्तिक निर्णय ठरू शकतो.
स्रोत : लोकसत्ता