Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 6:26 am

MPC news

तितीक्षा तावडेचं सासरचं घर पाहिलंत का? दिवाळीच्या दिवशी दाखवली घराची झलक; दारावर आहे खास नेमप्लेट

Titeeksha Tawde Nashik Home Tour : लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांची जोडी यावर्षी २६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. या दोघांनी ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. ओळख, मैत्री अन् नंतर याचं रुपांतर प्रेमात होऊन या ऑनस्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यात एकत्र येण्याचा निर्णय घेतला. तितीक्षा मूळची कोकणातली आहे तर, सिद्धार्थ हा मूळचा

मुंबईत थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर तितीक्षा व सिद्धार्थचं नाशिकच्या घरात जोरदार स्वागत झालं होतं. आपल्या सुनेचं स्वागत हक्काच्या घरात व्हावं अशी सिद्धार्थच्या आई-बाबांची मनापासून इच्छा होती. मात्र, बोडके कुटुंबीयांना यावर्षी गणपतीच्या सणाला नव्या घराचा ताबा मिळाला. यावर्षीचा गणेशोत्सव आणि आता लग्नानंतरची पहिली दिवाळी तितीक्षा-सिद्धार्थने नाशिकच्या नव्या घरात साजरी केली आहे.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर