मिरज मतदार संघातून काँग्रेसचे बंडखोर मोहन वनखंडे, सी. आर. सांगलीकर आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बाळासाहेब होनमोरे यांनी माघार घेतली असून मिरज मतदार संघामध्ये महायुतीचे पालकमंत्री सुरेश खाडे, महाविकास आघाडीचे तानाजी सातपुते आणि एमआयएमचे डॉ. महेश कांबळे अशी तिरंगी लढत होत आहे. इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव आणि तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे.

स्रोत : लोकसत्ता