Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 7:50 am

MPC news

सांगली: दिवाळी फराळासोबत पैशांचे वाटप; तासगावमध्ये १ लाख रुपये जप्त

सांगली : दिवाळी फराळासोबत पैसे वाटत असताना दोघांना पकडून १ लाख ३ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले. त्यांच्याविरुध्द तासगाव पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांना मतदान व्हावे यासाठी हे पैशाचे वाटप सुरू होते, असा आरोप माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी केला आहे.

उमेदवार रोहित पाटील यांची प्रचारफेरी साठेनगर परिसरात होती. या दरम्यान, काही कार्यकर्त्यांकडून दिवाळी फराळासोबत पैशाचे वाटप होत असल्याची तक्रार येताच माजी खासदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ध्वनिचित्रफितीवर कबुली घेण्यात आली. या यप्रकरणी पोलीस ठाण्यात व निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार करून दोघांना ताब्यात देण्यात आले.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर