Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 7:27 pm

MPC news

IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचं कसं असणार वेळापत्रक? भारतीय वेळेनुसार किती वाजता असणार सामना?

IND vs SA T20I Series Schedule With Date and Time: भारतीय संघाने नुकतीच न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळली. या मालिकेत टीम इंडियाची खूपच निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. या मालिकेत न्यूझीलंडने टीम इंडियाचा ३-० असा पराभव केला आहे. या पराभवामुळे भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठे नुकसान झाले आहे. यादरम्यान आता टीम इंडिया पुढील मालिकेसाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध चार सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे.

भारत वि दक्षिण आफ्रिकेतील टी-२० मालिका ८ नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघही दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. या मालिकेतील पहिला सामना ८ नोव्हेंबर रोजी किंग्समीड, डर्बन येथे होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना १० नोव्हेंबर रोजी सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा येथे होणार आहे. तिसरा सामना १३ नोव्हेंबर रोजी सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे होणार आहे. शेवटचा सामना १५ नोव्हेंबरला जोहान्सबर्ग येथे होणार आहे

टीम इंडियाने यावर्षी टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत पराभूत करत विजेतेपद पटकावले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाचा विक्रम खूपच अटीतटीचा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण २७ टी-२० सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाने १५ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने ११ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील केवळ एका सामन्याचा निकाल जाहीर होऊ शकला नाही. पण एकंदरीत पाहिल्यास टीम इंडिया कायमचं एक पाऊल पुढे राहिली आहे. या मालिकेत टीम इंडियाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद एडन माक्ररमकडे आहे.

IND vs SA: भारत वि दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचे वेळापत्रक

८ नोव्हेंबर – पहिला टी-२० सामना – डरबन – रात्री ८ वा
१० नोव्हेंबर – दुसरा टी-२० सामना – गकेबेहरा – रात्री ८ वा
३ नोव्हेंबर – तिसरा टी-२० सामना – सेंच्युरियन – रात्री ८ वा
१५ नोव्हेंबर – चौथा टी-२० सामना – जोहान्सबर्ग – रात्री ८ वा

IND vs SA: भारत- दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघ

भारत :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाक, आवेश खान, यश दयाल.

दक्षिण आफ्रिका
एडन मारक्रम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मॅपोंगवाना, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन, एंडिले सिमलेन, लूथो सिम्पाला, ट्रिस्टन स्टब्स

स्रोत : लोकसत्ता

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर