Maharashtra Vidhan Sabha Election Live Updates Today : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. वेगवेगळ्या पक्षांनी, उमेदवारांनी राज्यभर जोरदार प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, सोमवारी (४ नोव्हेंबर) दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे प्रयत्न चालू होते. त्या
त सर्वच पक्षांना काही प्रमाणात यश मिळालं आहे. तर, काही बंडखोऱांची समजूत काढण्यात नेते अपयशी ठरले आहेत. आता पुढचे काही दिवस राज्यभर केवळ प्रचार, राजकीय टिका-टिप्पण्या पाहायला मिळतील. सोमवारी सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जंगी सभेपासून त्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीसंबंधीच्या अशा सर्व बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
स्रोत : लोकसत्ता