Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 8:44 pm

MPC news

Mitchell Starc : मिचेल स्टार्कने मेलबर्नमध्ये घडवला इतिहास, ब्रेट ली आणि स्टीव्ह वॉ यांना मागे टाकत केला खास पराक्रम

Mitchell Starc 100 ODI Wickets Complete in Australia : ऑस्ट्रेलियाने मेलबर्न येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तानचा दोन विकेट्सनी पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने ४६.४ षटकात २०३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमानांनी ३३.३ षटकांत आठ गडी गमावून २० धावा करून सामना जिंकला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक ४४ धावांची खेळी साकारली. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

मिचेल स्टार्कने आपल्या वेगवान माऱ्याने पाकिस्तानी फलंदाजांना सर्वाधिक त्रास दिला. स्टार्कने १० षटकात केवळ ३३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने ३ निर्धाव षटकेही टाकली. या चमकदार कामगिरीमुळे मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियन भूमीवर इतिहास घडवला. वास्तविक, मिचेल स्टार्कने पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्ला शफीकच्या रूपाने पहिली विकेट घेतली. या विकेटसह स्टार्कने ऑस्ट्रेलियन भूमीवर एकदिवसीय क्रिकेटमधील १०० विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो सहावा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला. ब्रेट ली, ग्लेन मॅकग्रा आणि शेन वॉर्नसारख्या दिग्गज गोलंदाजांच्या क्लबमध्ये त्याने प्रवेश केला.

मिचेल स्टार्कच्या आधी ऑस्ट्रेलियाकडून मायदेशात १०० एकदिवसीय विकेट्स घेण्याचा पराक्रम ब्रेट ली, ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, क्रेग मॅकडरमॉट आणि स्टीव्ह वॉ यांनी केला होता. अब्दुल्ला शफीकची विकेट घेतल्यानंतर, स्टार्कने सॅम अयुब आणि शाहीन आफ्रिदीची विकेट घेत ऑस्ट्रेलियात सर्वाधिक एकदिवसीय विकेट घेण्याच्या बाबतीत स्टीव्ह वॉलाही मागे टाकले.

ऑस्ट्रेलियात सर्वाधिक एकदिवसीय विकेट्स घेणारे गोलंदाज :

  • १६९ – ब्रेट ली
  • १६१ – ग्लेन मॅकग्रा
  • १३६ – शेन वॉर्न
  • १२५ – क्रेग मॅकडरमॉट
  • १०२*- मिचेल स्टार्क
  • १०१ – स्टीव्ह वॉ

स्टार्कने सॅम अयुब आणि शाहीन आफ्रिदीला त्रिफळाचीत केले आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंड म्हणजेच एमसीजीवर सर्वाधिक फलंदाजांना त्रिफळाचीत करणारा गोलंदाज ठरला. त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रेट लीला माग टाकत हा मोठा विक्रम केला. ब्रेट लीने एमसीजीमध्ये ७ फलंदाजांना त्रिफळाचीत केले होते.

एकदिवसीय सामन्यात एमसीजीमध्ये सर्वाधिक फलंदाजांना त्रिफळाचीत करणारे गोलंदाज :

८ – मिचेल स्टार्क
७ – ब्रेट ली
४ – मिशेल जॉन्सन
४ – जेम्स फॉकनर

स्रोत : लोकसत्ता

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर