Explore

Search
Close this search box.

Search

December 4, 2024 12:28 pm

MPC news

अब्जावधी डॉलरची संपत्ती, कोट्यवधींच्या कार, अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किती श्रीमंत?

Donald Trump Networth : डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर अमेरिकेमधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत विजयश्री खेचून आणला. 2020 मधील पराभवाचा वचपा त्यांनी काढला. ट्रम्प हे कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्याकडे अनेक आलिशान आणि शानदार कार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष असतील. त्यांनी भारतीय वंशाच्या डेमोक्रेटिक पार्टीच्या कमला हॅरिस यांचा पराभव केला. ट्रम्प हे रिअल इस्टेटचे व्यावसायिक आहेत. त्यांची संपत्ती 6.49 अब्ज डॉलर इतकी असल्याचा दावा करण्यात येतो.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अनेक आलिशान बंगले आहेत. त्यातील एक एकदम खास आहे. फ्लोरिडा प्रांतामधील Mar-a-Lago बंगला येथे ते पत्नीसोबत राहतात.

फायनेन्शिअल टाईम्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे रोल्स- रॉयल सिल्व्हर क्लाउड, फँटम, मर्सिडिज बेंज एसएलआर मॅकलेरन, लॅम्बोर्गिनी डियाब्लो, टेस्ला रोडस्टर आणि कॅडिलॅक एलांटे यासारख्या कार आहेत. त्यांच्याकडे एक चॉपर पण आहे.

ट्रम्प यांची संपत्ती रिअल इस्टेटमधून कमावलेली आहे. त्यात ट्रम्प टॉवर आणि 1290 एव्हेन्यू ऑफ द अमेरिकामध्ये भागीदारी आहे. ट्रम्प हे मीडिया आणि टेक्नॉलॉजी समूहाचा पण भाग आहेत.

स्रोत: tv 9 मराठी
जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर