Explore

Search
Close this search box.

Search

December 4, 2024 12:41 pm

MPC news

सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, रात्रीच्या सुमारास फोन आला आणि…

सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, रात्रीच्या सुमारास फोन आला आणि…

Salman Khan: सलमान खान याच्या जीवाला धोका…. भाईजानला पुन्हा जीवेमारण्याची धमकी…, रात्रीच्या सुमारास फोन आला आणि…, गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्याला सतत येत आहेत जीवेमारण्याच्या धमक्या…

अभिनेता सलमान खान याला पुन्हा जीवेमारण्याची धमकी आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेला धमकीचा फोन आल्याची माहिती सध्या समोर येत आहे. रात्री अभिनेत्याला जीवेमारण्याची धमकी मिळाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सलमान खान याला बिष्णोई गँगकडून जीवेमारण्याची धमकी मिळाली आहे. याआधी देखील बिष्णोई गँगकडून सलमान खान याला अनेकदा धमकी मिळाली आहे.

सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान बिश्नोई गँगच्या रडारवर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्याला धमकी मिळत आहेत. यामुळे त्याच्या सुरक्षिततेही वाढ करण्यात आली. मात्र त्यानंतर काल सलमानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली. सलमान खानला सतत मिळत असल्याल्या धमक्यांमुळे कुटुंबिय आणि चाहते देखील चिंतेत आहेत.
याआधी देखील सलमान खानला धमकी देण्यात आली होती. सलमान खानने माफी मागावी, अन्यथा त्याला जीवे मारण्यात येईल, असा धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाला होता. काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सलमान खानने माफी मागावी नाही तर, 5 कोटी रुपये द्यावे… अशी धमकी देखील अभिनेत्याला बिष्णोई गँगकडून मिळाली आहे.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथे तिघांन गोळीबार करून हत्या केली. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आत्तापर्यंत 14 ते 15 जणांना अटक केली आहे. सध्या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत.
‘जो कोणी सलमान खानची मदत करेल त्याने स्वतःचा हिशेब करुन ठेवावा…’ अशी फेसबूक पोस्ट करत लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. शिवाय स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतः सलमान खान याने बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. सध्या सलमान खान त्याला मिळत असलेल्या जीवेमारण्याच्या धमक्यांमुळे चर्चेत आहे.

स्रोत: tv 9 मराठी

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर