मुंबईत आपल्या सरकारने कोस्टल रोड तयार केला. देशातील सर्वात मोठा २२ किमीचा सागरी सेतू बांधला. वांद्रे-वर्सोवा सी-लिंकचे काम आपल्या सरकारने सुरु केले. विरार ते वर्सोवा अशी कनेक्टिव्हिटी आपण आता करत आहोत. खऱ्या अर्थाने मुंबईचा चेहरा बदलण्याचे काम आपण करत आहोत मात्र विकास करत असताना कोळी बांधवांवर कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षताही आपण घेतलेली आहे.

स्रोत: लोकसत्ता