Maharashtra Corona Update : राज्यात 2,075 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात बुधवारी दिवसभरात 237 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 455 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, सध्या 2,075 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार, आजवर 78 लाख 71 हजार 803 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 77 लाख 21 हजार 965 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.10 टक्के आहे.

राज्यात काल दिवसभरात 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 43 हजार 759 जण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. आजपर्यंत 7 कोटी 87 लाख 94 हजार 179 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.