India Corona Update : देशात 20,799 नवे कोरोना रुग्ण, केरळमध्ये 12,297 नव्या रुग्णांची नोंद 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशात 20 हजार 799 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 12 हजार 297 रुग्ण एकट्या केरळमध्ये वाढले आहेत. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून. सध्या देशात 2 लाख 64 हजार 458 ॲक्टिव्ह रुग्णावर उपचार सुरू आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 38 लाख 34 हजार 702 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 31 लाख 21 हजार 247 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 26 हजार 718 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील 24 तासांत देशात 180 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. भारतात आजवर 4 लाख 48 हजार 997 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.90 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 57 कोटी 42 लाख 52 हजार 400 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 9 लाख 91 हजार 676 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 90 कोटी 79 लाख 32 हजार 861 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.