Pune : बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामध्ये मास रेड; 21 मुलींची वेश्याव्यवयातून सुटका

एमपीसी न्यूज – बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामध्ये मास रेड टाकून 21 मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात असून,  ही कारवाई  सोमवारी (दि.29) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान करण्यात आली

कल्पना राजू शर्मा(वय 38, रा.बुधवार पेठ), अनु लक्ष्मिकांत शर्मा (वय 65, बुधवार पेठ), झरिना सुनिल तमांग(वय 47, रा.बुधवार पेठ), गंगामाया जिवन तमांग (वय 50, बुधवार पेठ), सैली सोमन लामा(वय 40, रा. बुधवार पेठ), व राजू यांच्या विरूद्ध फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार पेठेतील रेड  एरियामध्ये मास रेड टाकून एकूण 21 मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. यामध्ये 5 मुली या अल्पवयीन होत्या तर त्यातील 2 मुलींची जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यापूर्वी त्यांची सुटका करण्यात आली आहे.

काल सोमवारी(दि.29) पहाटेच्या वेळी अज्ञात महिलेच्या मदतीने महाराष्ट्रातील त्या दोन अल्पवयीन मुलींनी चांगले काम देण्याच्या बहाण्याने डोंबिवली येथून आणले होते.  याप्रकरणी वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणा-या सहा जणांवर फरासखाना
पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पिडीत मुलींना हडपसर महमंदवाडी येथील रेस्क्यू होम येथे संरक्षणकामी ठेवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.