Pimpri : सराईत गुन्हेगाराकडून 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अल्पवयीन मुलगाही ताब्यात; गुन्हे शाखेची कामगिरी

एमपीसी न्यूज – एका सराईत गुन्हेगारासह अल्पवयीन मुलास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी 21 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

शंकर उर्फ हड्या मधकर पवार, (वय 19, रा. सोमाटणे गांव, ता. मावळ, जि. पुणे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी सचिन मोरे यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार मुकाई चौक, रावेत येथे सापळा लावून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने आपल्या दोन साथीदारांसोबत पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, वाकड, लोणवळा या भागामध्ये घरफोड्या चोऱ्या व चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्या दोघांकडून चोरलेल्या दोन हदांई वेरना मोटारी, मोटार सायकल, एलईडी टिव्ही, होम थिएटर, लॅपटॉप, मोबईल व 13 तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 21 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच आरोपीने त्याचे साथीदाराचे मदतीने वाकड येथून होन्डा सिटी मोटार तसेच हिंजवडी येथन मारूती सियाज मोटार चोरल्या होत्या. त्या मोटारी संशयावरून सोलापूर ग्रामीण पोलिसांनी यापूर्वी जप्त केल्या आहेत. परंतु त्यावेळी त्यांना आरोपी मिळून आला नव्हता. तसेच आरोपीने यवत येथून चोरलेली मोटार सायकल ही कात्रज येथे चोरी करताना सोडून पळून गेला होता. ती स्थानिक पोलिसांनी जप्त केली असल्याचे उघड झाले आहे. आरोपी शंकर उर्फ हड्या मधूकर पवार हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर पंढरपूर, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, पुणे शहर, पुणे ग्रामीण व पिंपरी-चिंचवड येथे एकूण 10 घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, कर्मचारी रवींद्र राठोड, रवींद्र गांवडे, शिवाजी कानडे, आप्पा लांडे, काळू कोकाटे, अमित गायकवाड, महेंद्र तातळे, मनोजकुमार कमले, अंजनराव सोडगीर, मारुती जायभाय, प्रविण पाटील, गणेश सावंत, विशाल भोईर, विजय मोरे, सचिन मोरे, प्रमोद गर्जे, तानाजी पानसरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.