Punawale News : सेवा सप्ताहानिमित्त आयोजित शिबिरात 21 जणांचे रक्तदान  

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुनावळे विभागातर्फे सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहानिमित्त आयोजित शिबिरात 21 जणांनी रक्तदान केले. लोटस बिझिनेस स्कुल, पुनावळे येथे रविवारी (दि.09) हा कार्यक्रम पार पडला. 

यावेळी आकुर्डी गट संघचालक राजेश भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. लोटस स्कुलचे प्रा. गणेश पाठक, स्वयंसेवक गण अपूर्व पुनीवाला, प्रसून राय, विनोद चौधरी, समर वाचासुंदर, अनंत जोशी, गुरुनाथ कुलकर्णी, सचिन पाटील यांनी संयोजन केले. गरवारे रक्तपेढी (MIT वैद्यकीय महाविद्यालय, तळेगाव) तर्फे डॉ. पिंगळे, वर्मा, संपर्क अधिकारी राहुल पारगे यांनी रक्तसंकलनाची व्यवस्था केली.

राहुल देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले, सुमेध जावळेकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.