Maval : मावळ तालुका संजय गांधी निराधार योजने अंतर्गत 210 प्रकरणे मंजूर

आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या प्रयत्न

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना अंतर्गत प्रस्ताव दाखल होते त्या पैकी 210 प्रकरणे मंजूर करण्यात आली. त्याच प्रमाणे दिव्यांग व्यक्तीना अपंगत्व टक्केवारी नुसार प्रमाणपत्रे महसूल भवन वडगाव मावळ येथे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या शुभहस्ते देण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी सर्व लाभार्थी तसेच तहसीलदार रणजित देसाई ,भा ज पा अध्यक्ष प्रशांत अण्णा ढोरे, सभापती गुलाबराव म्हाळस्कर, उपसभापती शांताराम बापु कदम, जेस्ट नेते माऊली मामा शिंदे, जेस्ट नेते ज्ञानेश्वर दळवी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुर्यकांतजी वाघमारे जी .प. स. नितीन मराठे, अलकाताई धाणीवले , किसन घरदाले ,अजित आगळे,बाळासाहेब घोटकुळे विजय टाकवे, नितीन घोटकुळे, मॅचिंद्र केदारी, वैद्यणिताई रणपिसे, नागेश ओव्हाळ, राहुलभाऊ कारले व भहुसंख्येने नागरिक उपस्थित होते

यावेळी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष किरणभाऊ राक्षे यांनी उपस्थितांचे। स्वागत करून प्रास्ताविक केले सभेच्या अध्यक्ष स्थानी आमदार बाळा भेगडे होते सर्व उपस्थितांचे आभार मंगेश शेलार यांनी मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.