एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असली. तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या तब्बल 2107  जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. पहिल्यांदाच एवढ्या संख्येने रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

तर,  विविध भागातील 870 आणि शहराबाहेरील 33 अशा  903 जणांचे आज (शनिवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान, शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 22 हजार 63 वर पोहोचली आहे.

आज  18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.   काळेवाडीतील 53, 60, 70 वर्षीय तीन महिला,  पिंपरीतील 38 वर्षीय युवक, निगडीतील 80 वर्षीय वृद्ध,  48 वर्षीय पुरुष, मोशीतील 65 वर्षीय पुरुष, मिलिंदनगर येथील 40 वर्षीय पुरुष, पिंपळेगुरव येथील 80 वर्षीय वृद्ध, चिंचवड मधील 47 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष,  चिखलीतील 42 वर्षीय पुरुष, वाल्हेकरवाडीतील 26 वर्षाचा युवक, रहाटणीतील 65 वर्षीय पुरुष, खेड येथील 55, 72, 58 वर्षीय तीन पुरुष,  विशालगड पुणे येथील 57 वर्षीय पुरुष कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 22 हजार  63 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 14, 682 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 349 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 90 अशा 439 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3553 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल!
#दाखल झालेले संशयित रुग्ण – 4357
# पॉझिटीव्ह रुग्ण – 903
#निगेटीव्ह रुग्ण – 3630
#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण -1226
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 3553
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 4261
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या -22,63
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 3553
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 439
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या -14,682
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 24276
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 78009