Chinchwad News : मोफत आरोग्य शिबिराचा 212 कुटुंबीयांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज – पार्थ पवार सोशल फाउंडेशन आणि श्री समर्थ आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने वाल्हेकरवाडी येथील विठ्ठल मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. रविवारी (दि. 23) झालेल्या या शिबिरात 212 कुटुंबीयांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

विकास वाल्हेकर, सुनील वाल्हेकर, संदीप वाल्हेकर, वसंत ढवळे, सचिन वाल्हेकर, बाजीराव वाल्हेकर, विशाल गायकवाड, अजिंक्य वाल्हेकर, महीपती मगर, दुर्गेश सुर्वे, चेतन कानजवणे, तुषार जाधव, बाबु नढे, शुभम वाल्हेकर, रुतिक वाल्हेकर, विराज वाल्हेकर, तेजस वाल्हेकर, चेतन वाल्हेकर, मंगेश वाल्हेकर, अमृत मरळ, जुनेद शेख, ऋषिकेश बधाले, निखिल वायदंडे, अशोक हांगे आदी उपस्थित होते.

मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये डोळे, ब्लडप्रेशर, शुगर, ऑक्सीजन पातळी, वजन आणि बाॅडी मास इंडेक्स आदी तपासण्या करण्यात आल्या. डॉ सुमीञा घावरी, डाॅ कार्तिक थोरात, नवनाथ अखाडे, सागर हिपकर यांनी नागरिकांच्या तपासण्या केल्या. या शिबीराचे नियोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तुषार वाल्हेकर, सरचिटणीस तेजस चिकने यांनी केले. धनंजय वाल्हेकर यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.