नोटा मोजून देण्याच्या बहाण्याने महिलेचे 21500 रुपये पळवले


एमपीसी न्यूज – नोटा मोजून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने महिलेचे 21 हजार 500 रुपये हातचलाखीने पळवले. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिता देवराम वाघोले (वय 52, रा. परंदवडी ता. मावळ) यांनी बुधवारी औषधोपचारासाठी तळेगाव स्टेशन येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून 50  हजार रुपये काढले. त्या पैसे मोजत असताना, एका अज्ञात भामट्याने त्यातील पाचशे रुपयांची नोट खोटी असल्याचे भासविले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या 50 हजार रुपयांच्या नोटा मोजून देण्याचा बहाणा केला. त्यातील 21 हजार 500 रुपये हातचलाखी करून भामट्याने  पळविले. 

पुढील  तपास पोलीस नाईक दत्तात्रय हत्ते करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.