२२ एप्रिल : दिनविशेष

What Happened on April 22, What happened on this day in history, April 22. See what historical events occurred, which famous people were born and who died on April 22.

२२ एप्रिल : दिनविशेष – जागतिक पृथ्वी दिन

२२ एप्रिल – महत्वाच्या घटना

  • १०५६: क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट झाला.
    १९४८: अरब-इस्त्रायल युद्ध – अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.
    १९७०: पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
    १९७७: टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फाइबरचा वापर केला गेला.
    १९९७: राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला.
    २००६: प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातून गोळ्या झाडल्या.

२२ एप्रिल – जन्म

  • १६९८: नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष शिवदिननाथ यांचा जन्म.
    १७२४: जर्मन तत्त्ववेत्ता एमॅन्युएल कांट यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी १८०४)
    १८१२: भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे डलहौसी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १८६०)
    १८७०: रशियन क्रांतिकारक व्लादिमीर लेनिन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९२४)
    १९०४: अणुबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९६७)
    १९१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बलदेव राज चोपडा यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००८)
    १९१६: अभिनेत्री आणि गायिका काननदेवी यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १९९२)
    १९१६: व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक यहुदी मेन्युहीन यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९९९)
    १९२९: चित्रपट रंगभूमी आणि अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च २००० – नाशिक)
    १९२९: भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक प्रा. अशोक केळकर यांचा जन्म.
    १९३५: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक भामा श्रीनिवासन यांचा जन्म.
    १९४५: भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म.

२२ एप्रिल – मृत्यू

  • १९३३: रोल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक हेन्री रॉयस यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १८६३)
    १९८०: जर्मन भौतिकशात्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १९०२)
    १९९४: विचारवंत, समाजसुधारक आचार्य सुशीलमुनी महाराज यांचे निधन.
    १९९४: अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९१३)
    २००३: पंजाबी नाटककार, दिग्दर्शक आणि कादंबरीकार बळवंत गार्गी यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१६ – भटिंडा, पंजाब)
    २०१३: व्हायोलीन वादक, संगीतकार आणि गायक लालगुडी जयरामन यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९३०)
    २०१३: भारताचे २७ वे सरन्यायाधीश जगदीश शरण वर्मा यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १९३३)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.