Pune : रोटरी साम्राज्ञी सौंदर्य स्पर्धेत 22 महिला सदस्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब शनिवारवाडाच्या वतीने ‘रोटरी साम्राज्ञी’ या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे २२ महिला रोटरी सदस्य महिलांनी सहभाग घेतला.

या स्पर्धक महिलांनी देशाच्या कश्मीर ते कन्याकुमारी व गुजरात ते अरुणाचल प्रदेश येथील विविध वेशभूषा केली. तसेच नृत्य, कविता, विनोदी प्रसंग सादर केले. या कार्यक्रमाचे संयोजन रोटरी क्लब शनिवार वाडाच्या अध्यक्ष रो.अनीता पाटील,सेक्रेटरी किर्ती भाटी यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह कर्वे रोड येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी रो. अणिता पाटील, किर्ती भाटी, प्रमुख पाहुण्या जयश्री धोत्रे,परीक्षक सहाय्यक प्रांतपाल मीना भोंडवे, रोहिणी मेहंदळे, मोनिका पलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

विजेत्या स्पर्धक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक – डायमंड क्राऊन विजेत्या रेशमा फडतरे(रोटरी क्लब तळेगाव), दुसरा क्रमांक गोल्ड क्राऊन अमिता गोडबोले (रोटरी क्लब पुना वेस्ट), तृतीय क्रमांक सिल्व्हर क्राऊन – माधुरी घाटे (रोटरी क्लब पुना वेस्ट),उत्तेजनार्थ वर्षा कारंजे (रोटरी क्लब शिकरापूर).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.