Mountaineering Club : पिंपरी चिंचवड माउंटेनिअरिंग क्लबच्या 22 सदस्यांनी 5364 मीटर उंचीचा एव्हरेस्ट बेस कॅम्प केला सर!

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड माउंटेनिअरिंग क्लबच्या (Mountaineering Club) 22 सदस्यांनी नेपाळमध्ये 5364 मीटर उंचीचा एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला. तसेच, त्यामधील 7 सदस्यांनी कालापत्थर 5644 मीटर उंचीचे शिखर पण सर केले. पुणेमधील इतक्या मोठ्या संख्येने या ट्रेकसाठी जाणारी कदाचित ही पहिलीच मोहीम होती. 

या मोहिमेचे आयोजन 2020 रोजी केले होते. परंतु, कोरोना संकटामुळे गेली 2 वर्ष ही मोहीम होऊ शकली नाही.  पण या वर्षी सर्व नियम शिथिल झाल्याने ही मोहीम आखण्यात आली. या मोहिमेसाठी गिर्यारोहकांच्या क्लबचे उपाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी कसून सराव करून घेतला होता. यात कात्रज ते सिंहगड, चौराई देवी (सोमाटने फाटा) ते लोहगड हे रात्रीचे ट्रेक केले. तसेच, रोज पहाटे 5 वाजता घोरवडेशवर येथे जाऊन सराव केला होता.

या आधी पिंपरी चिंचवड माउंटेनिअरिंग क्लबने माऊंट एलब्रूस, माऊंट मेरा ई. हिमालयीन मोहीम यशस्वी केल्या आहेत. ही मोहीम एकूण 17 दिवसांची होती.

Pune District Football Association : साई स्पोर्टस, बेटा संघांचा संघर्षपूर्ण विजय

या मोहिमेत पुढील सदस्य सहभागी झाले होते – 

ही मोहिम (Mountaineering Club) माऊंट एलब्रूस, माऊंट मेरा या मोहिमेत सहभागी असलेले सतिश बुर्डे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. बाकी सदस्य हरिदास जोगदंड (वय 73 वर्षे), भगवान खेडकर (वय 73 वर्ष), राजेंद्र क्षीरसागर, अभय जोगदंड, अरुण बोरकर, शंकर राणे, गणेश म्हेत्रे, निखिल भांगरे, विपुला नाडकर्णी, आशुतोष गोळविलकर, सुयोग खोचरे, सुभाष नावंदे, संस्कृती शिंदे (वय 19 वर्षे) तसेच या मोहिमेत 4 जणांनी जोडीने म्हणजे आपल्या जीवनसाथी बरोबर हा ट्रेक पूर्ण केला यात नेताजी भंडारे आणि माधुरी भंडारे, प्रशांत विनोदे आणि सिमा विनोदे, प्रमोद कोबन आणि दिपीका कोबन, अजय शिंदे आणि डॉ.रश्मी शिंदे हे सहभागी झाले होते. या सर्व गिर्यारोहकांना क्लबचे सचिव एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांचे मार्गदर्शन लाभले होते.
तसेच 7 सदस्यांनी माऊंट कालापत्थर उंची 5644 मीटर हे खडतर शिखर पण सर केले. यात राजेंद्र क्षिरसागर, गणेश म्हेत्रे, सुयोग खोचर, आशुतोष गुळवेलकर, नेताजी भंडारे, माधुरी भंडारे आणि ज्येष्ठ सदस्य भगवान खेडकर (वय 73 वर्षे) यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्या बद्दल क्लबच्या वतीने क्लबचे अध्यक्ष डॉ.मिलिंद खाडीलकर यांनी टीम लीडर सतिश बुर्डे यांना फोन करून सर्वांचे अभिनंदन केले. अशी माहिती क्लबचे खजिनदार अविनाश पिंगळे यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.