Pune – मिक्सर ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज – मिक्सर ट्रॅकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी (दि.2) रात्री साडेसात च्या दरम्यान मुंढवा रेल्वे ओव्हरब्रिजवर घडली. प्राची सतीश भुजबळ(वय 22, रा. अँमेनोरा टाऊन पार्क) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी श्रुतिका शिंदे (वय 20, रा. हडपसर) हिने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रुतिका ही दुचाकीवर प्राची सोबत मुंढवा रेल्वे ओव्हरब्रिजवरून जात असताना एका अज्ञात मिक्सर ट्रक चालकाने त्यांना भरघाव वेगात येऊन पाठीमागून धडक दिली. यामध्ये श्रुतिका ही जखमी झाली परंतु प्राची च्या डोक्यावरून त्या मिक्सर ट्रेकचे चाक गेल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्राचीच्या मृत्यूला जबाबदार असणारा ट्रकचालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता तेथून पळून गेला.

याप्रकरणी अज्ञात मिक्सर ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.