Pune News : पुण्यात 22 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज : पुण्याच्या येवलेवाडी भागात एका 22 वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आला. कार्तिक जाधव असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अल्पवयीन असताना त्याने एक खून केला होता. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील येवलेवाडी भागात कामठे पाटील नगर येथे रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान मयत कार्तिक जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. अल्पवयीन असताना त्यांनी हा खून केला होता. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी वर गुन्हा दाखल केला असून पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.