Pune Corona Update : पुण्यात 225 नवे रुग्ण ; 258 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुणे शहर आणि उपनगरात काल दिवसभरात 225 नवे रुग्ण आढळले. तर 258 कोरोनामुक्त नागरीकांना घरी सोडण्यात आले. 

महापालिकेच्या आकडेवारीनुसार काल  206 जणांची प्रकृती चिंताजनक असून 293 जण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 3 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 989 इतकी झाली आहे. कालपर्यंत 1 लाख 78 हजार 274 कोरोनामुक्त नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे.

महापालिका प्रशासनाकडून पुणेकरांना विनंती केली जात आहे की निर्धास्त न राहता घराबाहेर पडताना विविध ठिकाणी वावरताना तोंडाला मास्क लावा. हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करण्याचेही निर्देश दिले आहेत. तसेच सौम्य ते तीव्र लक्षणे आढळल्यास तातडीने अँटीजेन, स्वॅब टेस्टींग करून खबरदारी घ्यावी. तसेच पॉजिटिव्ह आढळल्यास घरातच विलगीकरण करावे. नजिकच्या रुग्णालयात औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.