State Corona Update: आज 2259 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 90,787

New 2259 corona patients registered today, total patient count 90,787

एमपीसी न्यूज – आज राज्यात 2259 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 90,787 झाली आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 120 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1663 कोरोना मुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आज 1663 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 42 हजार 638 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. आज कोरोनाच्या 2259 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 90 हजार 787 इतका झाला आहे.

पैकी सध्या 44 हजार 849 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज झालेल्या मृत्यूपैकी 49 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 11 मे ते 6 जून या कालावधीत आहे.

या कालावधीत झालेल्या 71 मृत्यूपैकी मुंबई 45, ठाणे 11, मीरा भाईंदर 6, औरंगाबाद 3, पनवेल 2, नाशिक, रत्नागिरी, वसई विरार येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 80 पुरुष तर 40 महिला आहेत. त्यातील 62 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 47 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत.

11 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 120 रुग्णांपैकी 91 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.