Pimpri News : पवना धरण परिसरात गेल्या 24 तासात 227 मिली मीटर पाऊस, 66.75 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्र परिसरात   गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासात धरण परिसरात 227 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून पाणीसाठ्यात 11.68 टक्यांनी वाढ झाली आहे.  धरणातील एकूण पाणीसाठा 66.75 टक्के झाला आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील  बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.  सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. पवना धरण परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर आहे.  त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे.

पवना धरणातील पाण्याची परिस्थिती!

#गेल्या 24 तासात झालेला पाऊस =  227मि.मि.

# 1 जूनपासून झालेला पाऊस =  1351मि.मि.

# गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस =       487
# धरणातील सध्याचा पाणीसाठा = 66.75% टक्के

# गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 34.96% टक्के

#  गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= 11.68% टक्के

# 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 35.16% टक्के*

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.