पिंपरीत 23 आयाराम भाजपचे नगरसेवक!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना, मनसे आदी विविध पक्षातील नगरसेवक, पदाधिका-यांना पक्षात आयात केले. भाजपच्या निष्ठावंतांना डावलून 35 आयारांमाना भाजपची उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी 23 आयाराम निवडून आले आहेत. तर, 12 जणांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. 

 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीसह विविध पक्षातील नगरसेवक, पदाधिका-यांना भाजपने पक्षात घेतले होते. आयात केलेल्या 35 जणांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे भाजपमधील निष्ठावंतांनी नाराजी व्यक्त केली होती. भाजपने उमेदवारी दिलेले 23 आयाराम निवडून आले आहेत.तर, 12 जण पराभूत झाले आहेत.  

 

भाजपने उमेदवारी दिलेल्या आयारामांपैकी राष्ट्रवादीचे नितीन लांडगे, नितीन काळजे, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, संतोष लोंढे, हर्षल ढोरे, राजेंद्र गावडे, सुजाता पालांडे, झामाबाई बारणे, सविता खुळे, माया बारणे, माई ढोरे, शैलेश मोरे शिवसेनेच्या सीमा सावळे, आशा शेंडगे, संगिता भोंडवे, संदीप वाघेरे, तुषार कामठे, तुषार हिंगे, काँग्रेसचे संजय नेवाळे, आरती चोंधे, जयश्री गावडे, राजेंद्र लांडगे, मनसेचे राहुल जाधव हे 23 उमेदवार भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत.

 

भाजपतर्फे उमेदवारी दिलेले शिवसेनेचे पांडुरंग साने, संगिता पवार, मनसेचे दिपक मोढवे, राष्ट्रवादीचे अरुण थोरात, यशवंत भोसले, प्रियंका ननावरे, सुरेश म्हेत्रे, अरुणा भालेकर, शांताराम भालेकर, बाळासाहेब तरस, राजेंद्र काटे आणि आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे या आयारामांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.