Vadgaon Maval News : मावळमध्ये 23 नवे कोरोना रुग्ण ; 20 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मंगळवारी (दि.17) 23 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात  दिवसभरात 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही, आतापर्यंत 523 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 293 आहे.

शहरी भागात 14 तर ग्रामीण भागात 9 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 9 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 3 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 2 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 26,510 झाली आहे. तर दिवसभरात 20 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे ग्रामीण 2, कामशेत, फळणे, भाजे, मुंढावरे, नवलाख उंब्रे, वराळे व कार्ला प्रत्येकी 1 असे एकूण 9 रुग्ण सापडले. 25,694 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 523 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8361, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4378 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1326 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 14066 रुग्ण तर ग्रामीण भागात 12,444 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.92 टक्के आहे तर  मृत्यू दर 1.97 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे  नगरपरिषद मध्ये 126 लोणावळा नगरपरिषद मध्ये 24 वडगाव नगरपंचायत मध्ये 14 व ग्रामीण भागात 129 असे एकूण 293 रुग्ण आहेत.अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.