Chakan News : खेड मध्ये नवीन 23 रुग्ण ; 4 मृत्यू ; 22 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात शनिवारी (दि. 28 ) 11 गावे आणि 2 पालिकांमध्ये 23 रुग्ण मिळून आले आहेत.  तर 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

खराबवाडी येथील 77 वर्षीय महिलेचा, रासे येथील 55 वर्षीय पुरुषाचा, कडूस येथील 60 वर्षीय पुरुषाचा आणि मरकळ येथील 61 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल आहे. सदर चे मृत्यू मागील काही दिवसातील असून शनिवारच्या दैनंदिन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 34 हजार 304 झाला आहे. यापैकी 33 हजार 523 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. शनिवारी दिवसभरात 22 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 261 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 4 मृत्यूने 520 एवढा झाला आहे.  सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 16 रुग्ण, चाकण 3, आळंदी 0, राजगुरुनगर 4 असे एकुण 23 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
काळूस,खरपुडी बु. , कोयाळी, मेदनकरवाडी , महाळुंगे , पिंपळगाव , पूर , रेटवडी या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे.  चिंचोशी मध्ये 2 रुग्ण मिळाले असून कडूस व शिरोली मध्ये प्रत्येकी 3 रुग्ण मिळून आले आहेत.

चाकण मधील लसीकरण ठप्प  

चाकण मध्ये एका खाजगी व्यक्तीस लसीकरण करण्यासाठी पैसे स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोन दिवसांपूर्वी अटक केल्यानंतर चाकण मधील लसीकरण ठप्प झाले आहे. लसीकरण केंद्रावर नागरिकांना निवारा मिळावा यासाठी उभारण्यात आलेला मंडप देखील काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे सकाळपासून येथे येणाऱ्या नागरिकांना नेमके काय झाले आहे हेच समजेनासे झाले आहे. येथील लसीकरण पुन्हा कधी सुरु होणार या बाबत नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.