Dehuroad : दिवसभरात 23 नवीन रुग्ण ; 10 रुग्णांना डिस्चार्ज

आजपर्यंत हद्दीत एकूण 555 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले. : 23 new patients throughout the day; Discharge to 10 patients

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतीलगांधी नगर, किन्हई, शितळानगर नं. 1 व 2 , चिंचोली, शेलारवाडी, मामुर्डी या भागात आज, बुधवारी एका दिवसात 23 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, आज तब्बल 10 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आजपर्यंत हद्दीत एकूण 555 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, बुधवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 23 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे.

रुग्णवाढीचे प्रमाण झोपडपट्टी भाग आणि गावठाण भागातील असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 555 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 32 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

95 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटर येथे 33 रुग्ण उपचार घेत आहे.  हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 15 इतकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.