Pune Crime : लग्नाचे आमिष दाखवून 23 वर्षीय तरुणीवर बलात्कार; नंतर मात्र लग्न करण्यास टाळाटाळ

एमपीसी न्यूज : ओळखीनंतर तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणीशी वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले. परंतु, नंतर या तरुणीला कुटूंबाने लग्नासाठी (Pune Crime) नकार दिल्याचे सांगत लग्न करण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात संतोष गणपत राठोड (वय 27) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 23 वर्षीय पिडीत तरुणीने तक्रार दिली आहे. जून 2022 ते मार्च 2023 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

Pune News : पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना वाहतूक पोलीस जाळ्यात; दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात कारवाई

 

तक्रारदार तरुणी मुळची पुण्यातील असून, तिची व आरोपीची गेल्या वर्षी ओळख झाली होती. त्यानंतर संतोष याने तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखविले. तसेच, तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले.(Pune Crime)  तरुणीने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर मात्र, कुटूंब या लग्नाला तयार नाहीत असे म्हणत टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. तसेच, लग्नाला नकार देऊन तिची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.