Lonavala : सिंहगड इन्स्टिट्यूटमधून 2468 विद्यार्थ्यांना मिळाल्या नोकर्‍या

 एमपीसी न्यूज : सिंहगड इन्स्टिट्यूट पुणे येथे आतापर्यंत झालेल्या कॅम्पस प्लेसमेंटमधून जवळपास 2468 विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये नोकर्‍या मिळाल्या आहेत. सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये प्लेसमेंट अँक्टिविटी सतत सुरू असतात. या कॅम्पस प्लेसमेंटसाठी आजपर्यंत 162 कंपन्यांनी सहभाग नोंदविला आहे.

यामध्ये टी.सी.एस., इन्फोसिस, कॉग्निझंट, विप्रो, महिंद्रा, सिंटेल, बिर्ला सॉफ्ट, जारो, बायजूज व अटलास कोपको या कंपन्यांचा सर्वात मोठा सहभाग आहे. आजपर्यंत मिळालेल्या नोकऱ्यापैकी सर्वाधिक वार्षिक पॅकेज 33.2 लाख रुपयांचे जे टी पी जपान या कंपनीचे आहे. सरासरी पॅकेज 3.5 लाख प्रतिवर्ष असे आहे. प्लेसमेंट झालेल्या 2468 पैकी 1333 मुलांना एक्सचेंर अँकंसेचर (775)  इन्फोसिस (289), कॉग्निझंट (269) मध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. आणि त्यांचे वार्षिक पॅकेज  3.5  लाख ते 4.5  लाख एवढे आहे.

सिंहगड संस्थेची विशेष बाब म्हणजे इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन खूप प्रभावी आहे. तसेच विद्यार्थ्यांना एस.टी.पी.(स्टुडन्ट ट्रेनिंग प्रोग्राम) कार्यक्रमातर्गत सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामध्ये सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, ग्रुप डिस्कशन,पर्सनल इंटरव्यूज, एप्टीट्यूड टेस्ट या गोष्टींचा सहभाग असतो. तसेच शैक्षणिक व उद्योगघराणी यांचा संबंध चांगल्या पद्धतीने प्रस्थापित करण्यामध्ये प्रा. जे एन पितांबरे( ट्रेनिंग प्लेसमेंट डीन), प्रा. योगेश जाधव ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर लोणावळा कॅम्पस यांचा मोठा वाटा आहे. सिंहगडचे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या खूप उत्कृष्ट आहेत. ही बाब आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी नमूद केलेली आहे, असे डॉ. अरविंद देशपांडे संचालक सिंहगड  वडगाव कॅम्पस ऑफ यांनी सांगितली.

आत्तापर्यंत झालेले प्लेसमेंट हे अतिशय समाधानकारक आहे, असे प्रा. पीतांबरे डीन, प्लेसमेंट सिंहगड इन्स्टिट्यूट यांनी सांगितले. प्रभावीपणे प्लेसमेंटची संख्या हेच सांगते आहे की विद्यार्थ्यांना करिअर घडवण्याची संधी देण्यामध्ये सिंहगड संस्था कोठेही कमी नाही आणि हे कार्य अजून अधिक प्रभावीपणे पुढे चालत राहणार आहे. कॅम्पस कनेक्टच्या विस्तृत धोरणामुळे सिंहगडच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्याची संख्या सुध्दा वाढत जाणारी आहे. कॅम्पस कनेक्टच्या धोरणाखाली वेगवेगळे कार्यक्रम सिंहगड इन्स्टिट्यूट घेत आहे. जसे कॉग्निझंट इनोव्हेशन चॅलेंज,  टी. सी. एस. कॅम्पस कम्युनिकेशन वेबिनार, ट्रेनिंग प्रोग्राम घेतले जात आहेत याच धोरणामुळे विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रभावी मदत होत आहे असे प्रा.पितांबरे  यानी सांगितले. रोहित नवले उपाध्यक्ष सिंहगड इन्स्टिट्यूटस, पुणे यांनी समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांचे व संबंधितांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.