Pimpri : महापालिका तिजोरीत 2482 कोटीचा महसूल 

उत्पन्न वाढीसाठी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांचा पुढाकार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेला 2019 ते 2020 या आर्थिक वर्षात 25 जानेवारी अखेर दोन हजार 482 कोटी 44 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामध्ये एलबीटीपोटीच्या अनुदानापोटी राज्य सरकारकडून 1407 कोटी 11 लाख रुपये मिळाले आहेत. सर्वाधिक बांधकाम परवाना विभागातून 558 कोटी तर सर्वात कमी उद्यान विभागातून 68 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी उत्पन्न वाढीसाठी पुढाकार घेतला होता.  

महापालिकेला एलबीटीपोटीच्या अनुदानापोटी राज्य सरकारकडून 1407 कोटी 11 लाख रुपये मिळाले आहेत. करसंकलन विभागाकडून 425 कोटी, बांधकाम परवानगी विभागातून 558 कोटी, आकाश चिन्ह परवाना विभाग 4 कोटी 37 लाख, भूमी आणि जिंदगी विभागातून एक कोटी 46 लाख, पाणीपुरवठा विभाग 34 कोटी 40 लाख, उद्यान 68 लाख आणि अग्निशामक विभागातून 51 कोटी 42 लाख असे एकूण दोन हजार 482 कोटी 44 लाखाचे  उत्पन्न दहा महिन्यात मिळाले आहे.

31 मार्च 2020 अखेर स्थानिक संस्था कर विभागाला 450 कोटी, करसंकलन विभाग 137 कोटी , बांधकाम परवानगी 200 कोटी , पाणीपुरवठा विभाग 20 कोटी , अग्निशामक विभाग 25 कोटी रुपये  उत्पन्नांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात महापालिकेच्या उत्पन्नामध्ये आणखीन भर पडणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.