२५ एप्रिल : दिनविशेष

What Happened on April 25, What happened on this day in history, April 25. See what historical events occurred, which famous people were born and who died on April 25.

२५ एप्रिल : दिनविशेष – जागतिक मलेरिया दिन

२५ एप्रिल – महत्वाच्या घटना

  • १८५९: सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.
    १९०१: स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले.
    १९५३: डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला.
    १९६६: एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.
    १९८३: पायोनिअर-१० हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले.
    १९८९: श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.
    २०००: वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.
    २०१५: ७.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळ देशात ९१०० जण मारले गेले.

२५ एप्रिल – जन्म

  • १२१४: फ्रान्सचा राजा लुई (नववा) यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १२७०)
    १८७४: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९३७)
    १९१८: हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९९३)
    १९४०: हॉलिवूडमधील अभिनेता अल पचिनो यांचा जन्म.
    १९६१: अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक करण राझदान यांचा जन्म.
    १९६१: भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक दिनेश डिसोझा यांचा जन्म.
    १९६४: भारतीय राजकारणी आर. पी. एन. सिंग यांचा जन्म.

२५ एप्रिल – मृत्यू

  • १९९९: साहित्यिक पंढरीनाथ रेगे यांचे निधन.
    २००२: लाटव्हियाच्या योगशिक्षिका इंद्रा देवी यांचे निधन. (जन्म: १२ मे १८९९)
    २००३: ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १९१४)
    २००५: भारतीय साधू आणि शिक्षक स्वामी रंगनाथानंद यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १९०८)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.