Hinjawadi fraud : जागेची नोंदणी न करता ग्राहकाची 25 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज : जागा खरेदी करून जागा मालकाला पैसे दिले.(Hinjawadi fraud) मात्र जागा मालकाने रजिस्ट्रेशन न करता 25 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 12 फेब्रुवारी 2013 रोजी आकाशीया या प्रोजेक्टमध्ये कासारसाई हिंजवडी येथे घडली.

हरीश वेणुगोपाल (वय 48, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाशीया या प्रोजेक्टतर्फे मालक के शब्बीर बाबू याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crypto currency fraud : ऑनलाईन खोटे अॅग्रीमेंट करत 23 लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीकडून सहा हजार 456 चौरस फूट जागा 26 लाख रुपयांना खरेदी केली. जागेच्या रजिस्ट्रेशन बाबत विचारणा केली असता आरोपीने टाळाटाळ केली.(Hinjawadi fraud) आरोपीने एक लाख रुपये परत करून उर्वरित 25 लाख रुपये परत न देता फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.