Pune : महिला आयोग आणि भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ आयोजित डिजिटल साक्षरता कार्यशाळेत २५० महिलांचा सहभाग 

एमपीसी न्यूज – राज्य महिला आयोग आणि भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’तर्फे आयोजित डिजिटल साक्षरता कार्यशाळेत 250 महिला सहभागी झाल्या. भारती विद्यापीठ एरंडवणे कॅम्पस मध्ये आज शनिवारी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.  

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉ. विजया रहाटकर, ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांच्या उपस्थितीत विनामूल्य कार्यशाळेचे उद्घाटन झाले. विविध ऑनलाईन सरकारी सेवा, भीम अॅप , उमंग अॅप, विषयी माहिती देण्यात आली. यावेळी डॉ. कीर्ती गुप्ता, स्वाती घैसास आणि संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.