Moshi : क्रेडीट कार्डची माहिती घेऊन महिलेची 25 हजाराची फसवणूक

एमपीसी न्यूज – क्रेडीट कार्डची व बोनस कार्डची माहिती सांगून ओटीपी क्रमांक घेतला. त्यानंतर क्रेडीट कार्डमधून 25 हजार रुपये काढून फसवणूक केली. मोशी येथे नुकताच हा प्रकार घडला.

_MPC_DIR_MPU_II

रुचिता प्रशांत कुंभारे (वय 23, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादी कुंभारे यांच्या मोबाईलवर फोन करून क्रेडीट कार्ड व बोनस कार्डची माहिती सांगितली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक विचारला.

फिर्यादी यांनी ओटीपी क्रमांक सांगितल्यानंतर आरोपीने त्यांच्या क्रेडीट कार्डमधून 25 हजार रुपये काढून घेऊन फिर्यादी कुंभारे यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.