रविवार, जानेवारी 29, 2023

Chinchwad News : 26/11 हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी भव्य सायकल रॅलीचे आयोजन

एमपीसी न्यूज : 26/11.. च्या मुंबई हल्ल्यात ज्या वीरांनी आपले प्राण पणाला लाऊन मोठी जीवित हानी टाळली त्यांच्या कार्याचे आणि बलिदानाचे स्मरण करून त्यांना (Chinchwad News) आदरांजली वाहण्यासाठी चिंचवड ते गेट वे ऑफ इंडिया अशा भव्य सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. रॅली चे हे सहावे वर्ष असून इको पेडलर्स आणि WOW यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅली चे आयोजन केले आहे.

Pimpri News : एलबीटीपासून सुटकेसाठी अभय योजना जाहीर करा

लोटस ग्रुप हे त्याचे अधिकृत पुरस्कर्ते आहेत. रॅली शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर रात्री 10 वाजता मुकाई चौक रावेत येथून निघेल आणि सकाळीं 9 वाजे पर्यन्त गेट वें ऑफ इंडिया इथे संपेल. सर्व सहभागी सायकलपटूना मेडल व प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे.या रॅलीमध्ये तब्बल 102 जणांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. लोटस ग्रुपचे श्री संतोष कर्णावट रॅली ला फ्लॅग ऑफ करतील.

Latest news
Related news