Tathawade News : भरधाव कारच्या धडकेत 26 वर्षीय युवकाचा मृत्यू 

एमपीसी न्यूज – भरधाव कारच्या धडकेत 26 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. नवले डेअरी जवळ, ताथवडे येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जलेश्वर रमेश यादव (वय 26) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ देविलाल रमेश यादव (वय 25, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत जलेश्वर यादव हा तरुण रस्त्याने जात असताना भरधाव आलेल्या कारने त्याला जोराची धडक दिली. या धडकेत जखमी झालेल्या जलेश्वर याचा मृत्यू झाला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.