दिल्लीला 27 तारखेला या प्रश्न सोडवितो – मनोहर पर्रीकर

एमपीसी न्यूज – बोपखेलचा रस्ता रहदारीसाठी खुला करण्यास सरकार सकारात्मक आहे. आता निवडणूक असल्यामुळे आश्वासन देता येत नसून 27 तारखेला दिल्लीला या संरक्षणासंदर्भातील पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व प्रश्न सोडवितो असे, आश्वासन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (शुक्रवारी) दिले. 

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पर्रीकर शहरात आले आहेत. दरम्यान त्यांनी पिंपळेसौदागर येथील गोविंद गार्डन येथे शहरातील संरक्षणासंदर्भातील प्रश्ना संदर्भात एक बैठक घेतली. यावेळी खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, शत्रुघ्न काटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.   

मनोहर पर्रीकर म्हणाले की, लष्कराच्या हद्दीतील रस्त्त्यांच्या समस्या कॅन्टोमेंट बोर्डामुळे आहेत. पुण्यातील घोरपडीचा पुलाचा प्रश्न सरकारने सोडविला आहे. दहशतवादी कारवायांमुळे संरक्षण विभागाला काही रस्ते बंद करावे लागतात. बोपखेलचा रस्ताही त्यामुळेच बंद केला आहे.  नागरिकांना रहदारीसाठी तो रस्ता खुला करण्यास सरकार सकारात्मक आहे.

आता निवडणूक सुरू आहे. त्यामुळे मला कोणतेही आश्वासन देता येत नाही. 27 फेब्रुवारीला तुमच्यापैकी कोणीही एकजण दिल्लीला या शहरातील संरक्षण खात्याशी संबंधित सर्व प्रश्न सोडवितो, असेही पर्रीकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.