शनिवार, डिसेंबर 3, 2022

प्रभाग क्रमांक 27 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विविध संघटनांचा पाठिंबा

एमपीसी न्यूज – काळेवाडी प्रभाग क्रमांक 27 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून या प्रभागातील उमेदवारांना विविध संघटनांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर झाला आहे. 

प्रभाग क्रमांक 27 मध्ये नगरसेवक कैलास थोपटे, अनिता मच्छिंद्र तापकीर, सविता नखाते, विशाल भालेराव यांच्या पॅनेलला नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उमेदवारांचा प्रचार व राष्ट्रवादी पक्षाचे विकासाचे धोरण पाहून संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या प्रभागात राष्ट्रवादीचे पाठबळ वाढतान दिसत आहे. ऐन निवडणुकीच्या रणसंग्रामात हा पाठिंबा राष्ट्रवादीसाठी बेरजेचे राजकारण ठरू शकते.
Latest news
Related news