रहाटणी-काळेवाडी प्रभाग क्र. 27 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या – भाग्यश्री मोटे

राष्ट्रवादीच्या प्रचार रॅलीला सर्वस्तरातून प्रचंड प्रतिसाद


एमपीसी न्यूज –  रहाटणी- काळेवाडीच्या विकासासाठी प्रभाग क्र. 27 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन सिनेअभिनेत्री तथा देवयानी फेम भाग्यश्री मोटे यांनी नागरिकांना केले. 

रहाटणीगाव- काळेवाडी या प्रभाग क्रमांक 27 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विशाल भालेराव, अनिता तापकीर, सविता नखाते, कैलास थोपटे यांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी थोपटे लॉन्स येथून जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी, त्यांनी मतदारांशी संवाद साधला. रॅलीमध्ये रहाटणी-काळेवाडीत राष्ट्रवादी पुन्हा…च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत रहाटणीगाव- काळेवाडी या प्रभाग क्रमांक 27 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या पक्षांमध्ये चांगलाच सामना रंगणार आहे. मात्र, या प्रभागामध्ये राष्ट्रवादीच्या पॅनलने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येते. विद्यमान नगरसेवकांसह नवीन चेहर्‍यांना संधी दिल्यामुळे आता या प्रभागामध्ये विकासाची लाट तयार झाली आहे. 

प्रचारफेरीला स्थानिक नागरिकांनी तुफान प्रतिसाद दिल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नागरिकांच्या समस्येची जाण असणार्‍या उमेदवारांना संधी दिल्यामुळे भाजपच्या नोटाबंदीच्या निर्णयाने नाराज झालेल्या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देण्याचा निर्धार केला आहे. तसेच, रॅलीसह उमेदवारांचे नागरिकांनी गल्लोगल्लीत स्वागत केले. उमेदवार विशाल भालेराव यावेळी म्हणाले की, या प्रभागाचा विकास खर्‍या खुर्‍या अर्थाने झाला आहे. प्रभागाचा अधिक विकास करण्यासाठी रहाटणीगाव- काळेवाडीच्या नागरिकांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीच्या पॅनलला निवडून देणे आवश्यक आहे. तरच आपल्या प्रभागाचा विकास होईल. 

राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार हे विकासाचा ध्यास असणार आहे. त्यामुळे या प्रभागाचा सर्वांगीण विकास होणार आहे. विद्यमान नगरसेविका अनिता तापकीर म्हणाल्या की, रहाटणीगाव- काळेवाडी प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हाच राष्ट्रवादीचा ध्यास आहे. प्रभागात रस्ते विकसीत झाले आहेत. समस्यांचे वेळेवर निराकरण केले असून प्रभागात स्वच्छतेची बोंबाबोब कुठेही दिसून येत नाही. शहरातील मुख्य भागांचा जसा विकास झाला आहे. त्याचप्रमाणे विकास होण्यासाठी राष्ट्रवादीला पाठिंबा देणे आवश्यक आहे. सविता नखाते म्हणाल्या की, ड्रेनेजलाईन व प्रभागातील ओढे नाल्यांचीही कामे झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत नाही. 

तुम्ही साथ दिल्यास आगामी काळात विविध नगर, कॉलन्यांमध्ये भेडसावणार्‍या बारिक-सारिक समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्या सोडविल्या जाणार आहे. विद्यमान नगरसेवक कैलास थोपटे यांनी प्रभागातील विकासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, पुढील पाच वर्षात रहाटणीगाव- काळेवाडीचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. सत्तेत असताना नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला आहे. तरी आता रहाटणीगाव- काळेवाडी प्रभाग क्रमांक 27 मधून राष्ट्रवादीच्या सर्व पॅनलला विजयी करून आपल्या नगराचा सेवक म्हणून काम करण्याची पुन्हा संधी द्या, असे कैलास थोपटे यांनी सांगितले. शनिवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रचार रॅलीला प्रभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दर्शविला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.